माघाची थंडी माघाची
माघाची थंडी माघाची, थंडीची धुंदी थंडीची
थंडीचा फुललाय काटा, अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता?
रोमारोमांत चांदणं फुललं, हो फुललं
तुमच्या मिठीत सपान झुललं, हो झुललं
राया कशाला खिडकी मिटता, अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता?
मला कशानं आली जाग?
भर थंडीत भिनली आग
मन चोरून मिशीत हसता, अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता?
बघा शिवारी कणीस हललं, हो हललं
नव्या माघानं हो रसरसलं, रसरसलं
किती व्हटानं मोती टिपता, अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता?

गीत | - | प्रवीण दवणे |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | रंजना जोगळेकर |
गीत प्रकार | - | लावणी |
शिवार | - | शेत. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.