मधुवंतीच्या सुरासुरांतून
मधुवंतीच्या सुरासुरांतून आळविते मी नाम
एकदा दर्शन दे घनश्याम !
नयनी माझ्या गोकुळ वसले
यमुनेचे जळ गाली झरले
राधेपरी मी सर्व वाहिले सुखशांतीचे धाम !
वसंतांतले सरले कूजन
तुझ्याविना हे उदास जीवन
शोधित तुजला फिरते वणवण, नाहि जीवा विश्राम
दासी मीरा ये दाराशी
घे गिरिधारी तव हृदयाशी
या पायाशी मथुरा-काशी, तीर्थापरी हे नाम !
एकदा दर्शन दे घनश्याम !
नयनी माझ्या गोकुळ वसले
यमुनेचे जळ गाली झरले
राधेपरी मी सर्व वाहिले सुखशांतीचे धाम !
वसंतांतले सरले कूजन
तुझ्याविना हे उदास जीवन
शोधित तुजला फिरते वणवण, नाहि जीवा विश्राम
दासी मीरा ये दाराशी
घे गिरिधारी तव हृदयाशी
या पायाशी मथुरा-काशी, तीर्थापरी हे नाम !
गीत | - | मधुकर जोशी |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
राग | - | मधुवंती |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भक्तीगीत |
कूजन | - | आवाज. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.