लिंबलोण उतरू कशी
लिंबलोण उतरू कशी अससि दूर लांब तू
इथून दृष्ट काढिते, निमिष एक थांब तू
एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका
तूच दुःखसागरी उभविलीस द्वारका
सर्वभार घेतला असा समर्थ खांब तू
धन्य कूस आईची धन्य कान-लोचने
कृतार्थ जन्म जाहला फिटुन जाय पारणे
अनंत कष्ट सोसले फेडिलेस पांग तू
शीणभाग संपला तृप्त माय जीवनी
आयु उर्वरित ते सरेल ईश चिंतनी
लाभले न जे कुणा असे सुदैव भोग तू
इथून दृष्ट काढिते, निमिष एक थांब तू
एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका
तूच दुःखसागरी उभविलीस द्वारका
सर्वभार घेतला असा समर्थ खांब तू
धन्य कूस आईची धन्य कान-लोचने
कृतार्थ जन्म जाहला फिटुन जाय पारणे
अनंत कष्ट सोसले फेडिलेस पांग तू
शीणभाग संपला तृप्त माय जीवनी
आयु उर्वरित ते सरेल ईश चिंतनी
लाभले न जे कुणा असे सुदैव भोग तू
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | एकटी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
निमिष | - | पापणी लवण्यास लागणारा काळ. |
पारणे फिटणे | - | समाधान होणे. |
लिंबलोण | - | दृष्ट काढण्याचे साहित्य. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.