लाविते ग सांजदिवा
मावळत्या किरणाचं पडे पाऊल दारात
झाली बाई सांजवेळ आल्या छाया अंगणात
परतला घरट्यात रानपाखरांचा थवा
लाविते ग सांजदिवा
चिमण्यांची चिंवचिंव येई गोड चिंचेतून
रुणुझुण वाजती ग संध्यादेवीचे पैंजण
जोजवितो मंद वारा अंकावरी बाळजिवा
लाविते ग सांजदिवा
इवले हे निरांजन उजळते वृंदावन
तुळशीमाई वाहते ग भावभक्तिने हे मन
जोडुनिया दोन्ही हात आळविते जीवाभावा
लाविते ग सांजदिवा
माझ्या सुखी संसारात तूच मला भरवसा
लपिन ग तुझ्या कुशी, तुला आईचा वारसा
उन्हपावसात आई मला जिवाचा विसावा
लाविते ग सांजदिवा
झाली बाई सांजवेळ आल्या छाया अंगणात
परतला घरट्यात रानपाखरांचा थवा
लाविते ग सांजदिवा
चिमण्यांची चिंवचिंव येई गोड चिंचेतून
रुणुझुण वाजती ग संध्यादेवीचे पैंजण
जोजवितो मंद वारा अंकावरी बाळजिवा
लाविते ग सांजदिवा
इवले हे निरांजन उजळते वृंदावन
तुळशीमाई वाहते ग भावभक्तिने हे मन
जोडुनिया दोन्ही हात आळविते जीवाभावा
लाविते ग सांजदिवा
माझ्या सुखी संसारात तूच मला भरवसा
लपिन ग तुझ्या कुशी, तुला आईचा वारसा
उन्हपावसात आई मला जिवाचा विसावा
लाविते ग सांजदिवा
गीत | - | राजा बढे |
संगीत | - | स्नेहल भाटकर |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | या मालक |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
अंक | - | मांडी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.