A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
काय या संतांचे मानूं

काय या संतांचे मानूं उपकार ।
मज निरंतर जागविती ॥१॥

काय द्यावें यांसी व्हावें उतराई ।
ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥२॥

सहज बोलणें हित उपदेश ।
करूनि सायास शिकविती ॥३॥

तुका ह्मणे वत्स धेनुवेचे चित्तीं ।
तैसें मज येथ सांभाळिती ॥४॥
गीत - संत तुकाराम
संगीत - प्रभाकर पंडित
स्वराविष्कार- सुरेश वाडकर
बबनराव नावडीकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - संतवाणी
  
टीप -
• स्वर- सुरेश वाडकर, संगीत- प्रभाकर पंडित.
• स्वर- बबनराव नावडीकर, संगीत- बबनराव नावडीकर, राग- बागेश्री.
उतराई - ऋणमुक्त.
धेनु - गाय.
वत्स - मूल.
सायास - विषेष आयास (कष्ट), श्रम.
भावार्थ-

  • या संताचे मी किती उपकार मानू? नेहमी उपदेश करून सावध करतात.
  • देवा या संतांचा मी कसा उतराई होऊ? यांच्या पायावरून जीव ओवाळून टाकला तरी थोडेच ठरेल !
  • संतांचे सहज बोलणे म्हणजे अम्हां सामान्य लोकांना हिताचा उपदेशच आहे.
  • तुकाराम महाराज म्हणतात, गाईच्या मनात जसे नेहमी वासरू असते त्याचप्रमाणे हे साधुसंत मला मनात आठवून सांभाळत असतात.

गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुरेश वाडकर
  बबनराव नावडीकर