दूर रानातून हलके
दूर रानातून हलके बासरीचा सूर आला
कृष्णवेड्या राधिकेचा देह सारा कृष्ण झाला
लागली चाहूल जेव्हा राधिकेच्या पाउलांची
आसमंतातून सार्या सूर मुरलीचा निघाला
मीपणाच्या बंधनांची बंधने जेव्हा गळाली
राधिकेच्या लोचनांतून जन्म कृष्णाचा बुडाला
सैल होणार्या मिठीचा थांबला आवेग जेव्हा
शांत यमुनेचा किनारा सावळ्या रंगात न्हाला

गीत | - | अनिल कांबळे |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | अनूप जलोटा |
गीत प्रकार | - | भावगीत, हे श्यामसुंदर |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.