लाडक्या पुंडलिका भेटी
लाडक्या पुंडलिका भेटी
थांबला देव वाळवंटी
मायपित्याची करिता सेवा
पुंडलिका तो कसा दिसावा?
अर्ध्या राती घेत विसावा
जोडपे करी कानगोठी
चुरता चुरता चरण आईचे
भक्त करी तो स्मरण हरीचे
कौतुक पाहत मातृप्रीतीचे
पंढरीराव उभा पाठी
थकली कुजबुज जेव्हा थोडी
पांघरू घाली सुत-पासोडी
करिता किंचित मान वाकडी
पाहिला श्रीवर जगजेठी
"देवा, येथुन उठू कसा रे?
जागी होतिल मातापितरे"
शब्दांविण हे सांगुन सारे
फेकली वीट हरीसाठी
थांबला देव वाळवंटी
मायपित्याची करिता सेवा
पुंडलिका तो कसा दिसावा?
अर्ध्या राती घेत विसावा
जोडपे करी कानगोठी
चुरता चुरता चरण आईचे
भक्त करी तो स्मरण हरीचे
कौतुक पाहत मातृप्रीतीचे
पंढरीराव उभा पाठी
थकली कुजबुज जेव्हा थोडी
पांघरू घाली सुत-पासोडी
करिता किंचित मान वाकडी
पाहिला श्रीवर जगजेठी
"देवा, येथुन उठू कसा रे?
जागी होतिल मातापितरे"
शब्दांविण हे सांगुन सारे
फेकली वीट हरीसाठी
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | गंगेत घोडं न्हालं |
गीत प्रकार | - | चित्रगीत, भक्तीगीत, विठ्ठल विठ्ठल |
गोठी | - | गोष्ट. |
पासोडी | - | दुहेरी जाड वस्त्र. |
श्रीवर | - | (श्रीवल्लभ) विष्णू. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.