कुणी काही म्हणा
कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा
अनुसरले मी अपुल्याच मना
रीत म्हणा, विपरीत म्हणा
दिले झुगारुनी आवरणा
रीती-कुरीती, नीती-अनीती
आता उरली चाड कुणा?
लोकलाज-भय धरू कशाला
मागायाचे काय जना?
जळल्या सार्या आशा मनीच्या
पुसल्या उरल्या त्याही खुणा
जीव भरेना, हौस पुरेना
वाढतोच घरी काम दुणा
यास्तव हा परपुरुष परिणिला
मन मिनले गोविंदगुणा
अनुसरले मी अपुल्याच मना
रीत म्हणा, विपरीत म्हणा
दिले झुगारुनी आवरणा
रीती-कुरीती, नीती-अनीती
आता उरली चाड कुणा?
लोकलाज-भय धरू कशाला
मागायाचे काय जना?
जळल्या सार्या आशा मनीच्या
पुसल्या उरल्या त्याही खुणा
जीव भरेना, हौस पुरेना
वाढतोच घरी काम दुणा
यास्तव हा परपुरुष परिणिला
मन मिनले गोविंदगुणा
गीत | - | ज. के. उपाध्ये |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | कृष्णा कल्ले |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
चाड | - | शरम. |
परिणय | - | विवाह. |
मिनणे | - | एकत्र होणे / प्राप्त होणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.