अरे खोप्यामधी खोपा
अरे खोप्यामधी खोपा
सुगडिणीचा चांगला
पहा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाला टांगला
पिल्लं निजती खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिल्लांमधी जीव
जीव झाडाला टांगला
खोपा विणला विणला
जसा गिलक्याचा कोसा
पांखराची कारागिरी
जरा बघ रे माणसा
तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले दिले रे देवानं
दोन हात, दहा बोटं
सुगडिणीचा चांगला
पहा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाला टांगला
पिल्लं निजती खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिल्लांमधी जीव
जीव झाडाला टांगला
खोपा विणला विणला
जसा गिलक्याचा कोसा
पांखराची कारागिरी
जरा बघ रे माणसा
तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले दिले रे देवानं
दोन हात, दहा बोटं
गीत | - | बहिणाबाई चौधरी |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | मानिनी (१९६१) |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
खोपा | - | घरटे. |
गन्यागंप्या | - | अजाजळ. |
गिलके | - | एक प्रकारची फळ भाजी. |
मिये | - | मिळे. |
सुगरन (सुगरण) | - | या पक्षिणीला खोपा (घरटे) विणता येतो. या पक्षाच्या नराला ते करता येत नाही. |
मूळ रचना
अरे खोप्यामधी खोपा
सुगरनीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला
पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला !
सुगरीन सुगरीन
अशी माझी रे चतुर
तिले जल्माचा संगाती
मिये गन्यागंप्या नर
खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पांखराची कारागिरी
जरा बघ रे मानसा !
तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं?
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.