कुणी ग बाई चोरुनि
कुणी ग बाई चोरुनि माझा हिरवा चाफा, चाफा खुडिला
उले न बाई ओठपाकळी, बोल जिभेवर अडला
उपवनांत या पाऊल वळलं
मोहर बघुनी मन हें चळलं
नांवहि कळलं, गांवहि कळलं, जीव तयावर जडला
भिवयांच्या खेचल्या कमानी
मिटुनी अर्धी नयनपापणी
जहर माखला तीर काजळी नजरेवरती चढला
मुकाच माझ्या मनचा रावा चतुराईनं लढला
परि बाई ग डाव उलटला
खेळाचा या रंग पलटला
संकोचाचा ससा अचानक हातांमधुनी सुटला
मदनाचा संदेश पारवा मनांत माझ्या दडला
उले न बाई ओठपाकळी, बोल जिभेवर अडला
उपवनांत या पाऊल वळलं
मोहर बघुनी मन हें चळलं
नांवहि कळलं, गांवहि कळलं, जीव तयावर जडला
भिवयांच्या खेचल्या कमानी
मिटुनी अर्धी नयनपापणी
जहर माखला तीर काजळी नजरेवरती चढला
मुकाच माझ्या मनचा रावा चतुराईनं लढला
परि बाई ग डाव उलटला
खेळाचा या रंग पलटला
संकोचाचा ससा अचानक हातांमधुनी सुटला
मदनाचा संदेश पारवा मनांत माझ्या दडला
गीत | - | राजा बढे |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | मालती पांडे |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • काव्य रचना- १९५४. |
उपवन | - | बाग, उद्यान. |
उले | - | उलणे / उघडणे / आतल्या जोराने फाटणे. |
पारवा | - | कबुतराची एक जात किंवा त्याच्या रंगाचा. |
रावा | - | पोपट. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.