A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुहु कुहु कुहु येई साद

कुहु कुहु कुहु येई साद
उधळित वनि स्वरतुषार
मधुर हे तराणे, ऋतुराज आज आला !

सुमनांचे रंग रंग ऋतु-रंगित झाले
गंधगीत रतिचंचल अवनीवर दरवळले
वारा भिरभिर हा तोडी बंध

विहगांचे अंतरंग मदमंथर झाले
स्वप्‍नशिल्प कलिकांच्या अधरावर थरथरले
सारे स्थिरचर बघ होई धुंद