शांती-दीप हा आज
पृथ्वीगोल हा उजळुनी सगळा
शांती-दीप हा आज निमाला
भारतमाते तुझिया पोटी
रत्न जन्मली कोटी कोटी
जगताची या दिपवून दृष्टी
निघे जवाहर लाल आजला
शांती-दीप हा आज निमाला
पुसुनी दीन-दुबळ्यांचे आसू
फुलवुनिया सूख-शांती-हासू
शमवून सारे युद्ध पिपासू
पुलकित करूनी सर्व भूतला
शांती-दीप हा आज निमाला
पुरे अता अणुशस्त्र निर्मिती
कोटी जिवांची त्यात आहुती
रम्य जगा ती नको विस्मृती
शांतीमंत्र हा देउनी सकला
शांती-दीप हा आज निमाला
शांती-दीप हा आज निमाला
भारतमाते तुझिया पोटी
रत्न जन्मली कोटी कोटी
जगताची या दिपवून दृष्टी
निघे जवाहर लाल आजला
शांती-दीप हा आज निमाला
पुसुनी दीन-दुबळ्यांचे आसू
फुलवुनिया सूख-शांती-हासू
शमवून सारे युद्ध पिपासू
पुलकित करूनी सर्व भूतला
शांती-दीप हा आज निमाला
पुरे अता अणुशस्त्र निर्मिती
कोटी जिवांची त्यात आहुती
रम्य जगा ती नको विस्मृती
शांतीमंत्र हा देउनी सकला
शांती-दीप हा आज निमाला
गीत | - | वसंत नलावडे |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | मन्ना डे |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
जवाहर | - | जवाहरलाल नेहरू. |
निमणे | - | लय पावणे / मरणे. |
पुलकित | - | आनंदित. |
पिपासू | - | तहानलेला. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.