क्षणभर भेट आपुली झाली
क्षणभर भेट आपुली झाली !
ओळख नव्हती मुळीच अपुली
नजर मात्र नजरेला भिडली
खुणा आंतरिक पटुनी काही हसू उमटले गाली
गूढ भाव नेत्रांत तरळले
रहस्य अपुले आपणा कळले
अनोळखीपण आड कशाला येईल मग त्या काली?
दूर उभा तू जरी मजपासुनी
अंतर मधले गेले तुटुनी
स्पर्शसुखाची दुरून आपण अनुभवलीच नव्हाळी
परिचय अपुला नसोच नसला
लौकिक परिचय हवा कुणाला?
युगायुगांची क्षणांत जर का ओळख जिवास पटली
ओळख नव्हती मुळीच अपुली
नजर मात्र नजरेला भिडली
खुणा आंतरिक पटुनी काही हसू उमटले गाली
गूढ भाव नेत्रांत तरळले
रहस्य अपुले आपणा कळले
अनोळखीपण आड कशाला येईल मग त्या काली?
दूर उभा तू जरी मजपासुनी
अंतर मधले गेले तुटुनी
स्पर्शसुखाची दुरून आपण अनुभवलीच नव्हाळी
परिचय अपुला नसोच नसला
लौकिक परिचय हवा कुणाला?
युगायुगांची क्षणांत जर का ओळख जिवास पटली
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | जी. एन्. जोशी |
स्वर | - | जी. एन्. जोशी |
गीत प्रकार | - | भावगीत |
नव्हाळी | - | तारुण्याचा भर. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.