आज मी आळविते केदार
फुले स्वरांची उधळित भवती गीत होय साकार
आज मी आळविते केदार !
गोड काहीतरी मना वाटले
अबोध सुंदर भाव दाटले
मुखी मनोगत सहज उमटले कंपित होता तार !
फिरत अंगुली वीणेवरती
मौनातुनी संवाद उमलती
स्वरास्वरांवर लहरत जाती भावफुले सुकुमार !
जे शब्दांच्या अतीत उरते
स्वरांतुनी या ते पाझरते
एक अनामिक अर्थ घेतसे स्वरांतुनी आकार !
आज मी आळविते केदार !
गोड काहीतरी मना वाटले
अबोध सुंदर भाव दाटले
मुखी मनोगत सहज उमटले कंपित होता तार !
फिरत अंगुली वीणेवरती
मौनातुनी संवाद उमलती
स्वरास्वरांवर लहरत जाती भावफुले सुकुमार !
जे शब्दांच्या अतीत उरते
स्वरांतुनी या ते पाझरते
एक अनामिक अर्थ घेतसे स्वरांतुनी आकार !
गीत | - | वसंत अवसरे |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | मधुबाला जव्हेरी |
चित्रपट | - | अवघाचि संसार |
राग | - | केदार |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
अंगुली | - | बोट. |
अतीत | - | पलीकडे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.