कृतार्थ करण्या जन्म आपुला
कृतार्थ करण्या जन्म आपुला
नित्य भजा गुरूवरा
स्मरा हो दिगंबरासी स्मरा
स्मरा हो दत्तगुरूंना स्मरा
गुरूपदांना करता वंदन
संसाराचे तुटती बंधन
सदैव स्मरुनी दत्तपदांना
ताप भवाचा हरा
जिथे भक्तिने प्रभूचे गायन
तिथे विराजे अत्रिनंदन
नामामृत हे अखंड सेवुन
जीवाला उद्धरा
ज्ञानभक्तिच्या उजळुनी ज्योती
गुरूनामाची गात आरती
सद्भावांच्या भावफुलांनी
पूजन गुरूचे करा
नित्य भजा गुरूवरा
स्मरा हो दिगंबरासी स्मरा
स्मरा हो दत्तगुरूंना स्मरा
गुरूपदांना करता वंदन
संसाराचे तुटती बंधन
सदैव स्मरुनी दत्तपदांना
ताप भवाचा हरा
जिथे भक्तिने प्रभूचे गायन
तिथे विराजे अत्रिनंदन
नामामृत हे अखंड सेवुन
जीवाला उद्धरा
ज्ञानभक्तिच्या उजळुनी ज्योती
गुरूनामाची गात आरती
सद्भावांच्या भावफुलांनी
पूजन गुरूचे करा
गीत | - | |
संगीत | - | |
स्वर | - | आर. एन्. पराडकर |
गीत प्रकार | - | दिगंबरा दिगंबरा, भक्तीगीत |
अत्रि | - | सप्तर्षींपैकी एक. दत्तात्रेय पिता. अनसूया पती. यांचा जन्म ब्रह्मदेवाच्या नेत्रापासून झाला होता. |
नंदन | - | पुत्र / इंद्राचे नंदनवन. |
भव | - | संसार. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.