A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रामाच्या बागंमंदी

चला रं..
रामा व रामा रामा

आवं रामाच्या बागंमंदी व बागंमंदी
आवं चावर्‍या मोटा दोनी व मोटा दोनी
आवं पाटानं जातंय पानी व झुळ्झुळ्वानी
कोन हाकितो हौशा धनी व हौशा धनी

आवं रामा व राम रामा
आवं रामाच्या बागंमंदी व बागंमंदी
राहीबाई ग राहीबाई ग तुझा दुल्लडीवाडा
वाड्याला वाड्याला तुझ्या खिडक्या चार
खिडक्याला खिडक्याला गडे काढिलं मोर
मोराला मोराला तुझ्या रेशमी गोंडं
रेशमी गोंडं वार्‍यानं डुलं
राहीबाई ग राहीबाई ग तुझा दुल्लडीवाडा

भलं रं दादा भलगडी दादा
भलं भलं