A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कृष्ण माझी माता

कृष्ण माझी माता । कृष्ण माझा पिता ।
बहिणी बंधु चुलता । कृष्ण माझा ॥१॥

कृष्ण माझा गुरू । कृष्ण माझें तारूं ।
उतरी पैलपारू । भवनदीची ॥२॥

कृष्ण माझें मन । कृष्ण माझें जन ।
सोइरा सज्जन । कृष्ण माझा ॥३॥

तुका ह्मणे माझा । श्रीकृष्ण विसावा ।
वाटे न करावा । परता जीवा ॥४॥
Random song suggestion