A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नका मारुं खडा

नका मारुं खडा, शिरीं भरला घडा
सख्या जाईल तडा, हें भिजेल गोरें अंग
ऐके न बाई तरि, हसे खदखदा असा कसा श्रीरंग

नको धरूं हात रे पिचेल माझा चुडा
सुटेल बाइ जुडा, अवखळा, भिजतिल काजळकडा
ऐके न बाई तरि, करि नयन वाकडा

थंडीत भरे हुडहुडी, थरकांपे माझी कुडी
ती खरी सुखाची घडी
घे बळेच ओढुनी कवळी रेशमी शेला

अधरीचा मधुरमधु मेवा, मुरलीस वाटला हेवा
हे असे काय हो देवा?
आतां फुटु द्या घडा, खुशाल मारा खडा
यापुढें कधिं न मी करीन हो ओरडा