किती म्हटलेस तू नाही
किती म्हटलेस तू नाही, तरी तुज मी हवा आहे
कुठे तू अन् कुठे माझा सखा मज जो हवा आहे !
मी पूर्व आहे
मी सूर्य आहे
मी रात आहे
मी चंद्र आहे
मी रोज स्वप्नी येणार आहे
कशी दिसणार मज स्वप्ने, मनी माझ्या दिवा आहे !
मी फूल आहे
मी गंध आहे
मी पान
ज्याचा मी रंग आहे
मासांतला मी मधुमास आहे
फुलुनी अंग ये ज्याने, ऋतू तो वेगळा आहे
या डोळियांनी
मज पाहसी तू
हे कान
ज्यांनी मज ऐकसी तू
मी तूच
तू मीच
हे
सत्य
आहे
हे सत्य आहे.
उरी राधेचिया जागा सदा या माधवा आहे
सख्या तुज मी हवी आहे
सखे तुज मी हवा आहे
कुठे तू अन् कुठे माझा सखा मज जो हवा आहे !
मी पूर्व आहे
मी सूर्य आहे
मी रात आहे
मी चंद्र आहे
मी रोज स्वप्नी येणार आहे
कशी दिसणार मज स्वप्ने, मनी माझ्या दिवा आहे !
मी फूल आहे
मी गंध आहे
मी पान
ज्याचा मी रंग आहे
मासांतला मी मधुमास आहे
फुलुनी अंग ये ज्याने, ऋतू तो वेगळा आहे
या डोळियांनी
मज पाहसी तू
हे कान
ज्यांनी मज ऐकसी तू
मी तूच
तू मीच
हे
सत्य
आहे
हे सत्य आहे.
उरी राधेचिया जागा सदा या माधवा आहे
सख्या तुज मी हवी आहे
सखे तुज मी हवा आहे
गीत | - | वसंत निनावे |
संगीत | - | बाळ बर्वे |
स्वर | - | चंद्रशेखर गाडगीळ, शोभा जोशी |
गीत प्रकार | - | युगुलगीत, भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.