अरुण उगवला अनुरागाचा
अरुण उगवला अनुरागाचा उजळत आभाळी
उषा प्रीतिची हासत लावी कुमकुम मंगल भाळी
नेत्रकमळीचा भ्रमर उडाला मरंद उधळीत
फुलू लागला हर्ष सुगंधी पुष्पपांकळीत
घेत भरारी जीव-पाखरे आळवीत भूपाळी
स्वर्गसुखाचा आज मोहरे कल्पतरू दारी
तुळस-मंजिरी डुलू लागली रामाच्या प्रहरी
जोडुनी कर हे प्रीत-सुवासीन प्रदक्षिणा घाली
उषा प्रीतिची हासत लावी कुमकुम मंगल भाळी
नेत्रकमळीचा भ्रमर उडाला मरंद उधळीत
फुलू लागला हर्ष सुगंधी पुष्पपांकळीत
घेत भरारी जीव-पाखरे आळवीत भूपाळी
स्वर्गसुखाचा आज मोहरे कल्पतरू दारी
तुळस-मंजिरी डुलू लागली रामाच्या प्रहरी
जोडुनी कर हे प्रीत-सुवासीन प्रदक्षिणा घाली
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
गीत प्रकार | - | भावगीत |
अनुराग | - | प्रेम, निष्ठा. |
अरुण | - | तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य. |
कल्पवृक्ष | - | इंद्रलोकांतील काल्पनिक वृक्ष. इच्छित वस्तू देतो अशी समजूत आहे. |
मंजिरी | - | मोहोर, तुरा. |
मरंद (मकरंद) | - | फुलातील मध. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.