खुळ्या खुळ्या रे पावसा
खुळ्या खुळ्या रे पावसा, किती भिजविसी मला?
नाही नाही म्हणताना मीही कवळिले तुला !
कसा वाहे गार वारा, अंग सारे थरथरे
त्यात तुझा अनावर वरतुनी हात फिरे
नाही नाही म्हणताना मीही कवळिले तुला !
कुठे जाऊ, धाऊ कुठे? आता पुरती भिजले
धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले
नाही नाही म्हणताना मीही कवळिले तुला !
नाही नाही म्हणताना मीही कवळिले तुला !
कसा वाहे गार वारा, अंग सारे थरथरे
त्यात तुझा अनावर वरतुनी हात फिरे
नाही नाही म्हणताना मीही कवळिले तुला !
कुठे जाऊ, धाऊ कुठे? आता पुरती भिजले
धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले
नाही नाही म्हणताना मीही कवळिले तुला !
गीत | - | शिरीष पै |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | हे गीत जीवनाचे |
गीत प्रकार | - | चित्रगीत, ऋतू बरवा |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.