खोडी माझी काढाल तर
खोडी माझी काढाल तर
अशी मारीन फाईट
घटकेमध्ये विरून जाईल
सारी तुमची ऐट !
अंगावरती याल तर
असा देईन ठोसा
कोपर्यात जाउन तुम्ही
रडत बसा !
बजरंग माझा भाऊ
भीम माझा काका
सांगुन ठेवतो पुन्हा माझ्या
वाटे जाऊ नका !
दंड माझे पाहा कसे
रोज दूध पितो
अंगामध्ये ताकद आहे
मग कोण भितो?
अशी मारीन फाईट
घटकेमध्ये विरून जाईल
सारी तुमची ऐट !
अंगावरती याल तर
असा देईन ठोसा
कोपर्यात जाउन तुम्ही
रडत बसा !
बजरंग माझा भाऊ
भीम माझा काका
सांगुन ठेवतो पुन्हा माझ्या
वाटे जाऊ नका !
दंड माझे पाहा कसे
रोज दूध पितो
अंगामध्ये ताकद आहे
मग कोण भितो?
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | मीना खडीकर |
स्वर | - | योगेश खडीकर |
गीत प्रकार | - | बालगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.