A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कसं काय पाटील बरं

कसं काय पाटील बरं हाय का?
काल काय ऐकलं ते खरं हाय का?

काल म्हणं तुम्ही जत्रेला गेला, तमाशात काळिज इसरून आला
इसरल्या ठायी गावलं का न्हाई, आज तरी संगती आणलंय का?

काल म्हणं तुम्ही तालुक्याला गेला, कमरंचा ऐवज हरवून आला
केली वाटमारी सांजच्यापारी, आज काय शिल्लक र्‍हायलंय का?

काल म्हणं तुम्ही इथंतिथं गेला, बघताबघता घोटाळा झाला
काय झालं पुढं सांगा तरी थोडं, खाली नका बघु आता लाजताय का?