जो नटला पापें
जो नटला पापें मधुभाषी ।
जनता कां त्या नेता गणी साचा? ॥
न रुचे करुणा जया ।
पतनिं तराया । होय वृथा वदतां वाचा ॥
जनता कां त्या नेता गणी साचा? ॥
न रुचे करुणा जया ।
पतनिं तराया । होय वृथा वदतां वाचा ॥
गीत | - | भा. वि. वरेरकर |
संगीत | - | वझेबुवा |
स्वराविष्कार | - | ∙ गोविंद माशेलकर ∙ स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा. ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | सत्तेचे गुलाम |
राग | - | भीमपलास |
ताल | - | त्रिवट |
चाल | - | लोगछवा प्यारे |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
साच | - | खरे, सत्य / पावलाचा किंवा हालचालीचा आवाज. |
कै. केशवरावांचे गुरु प्रो. रामकृष्णबुवा वझे यांनीं कंपनीच्या आपत्कालीं आपल्या सर्व अडचणी दूर सारून नवीन नाटक यशस्वी करण्याकरितां अगदीं नवीन व श्रुतिमनोहर चाली दिल्या व स्वतः अनेक प्रकारें परिश्रम करून कंपनीला चिरस्थायी करण्यास जें साहाय्य केलें, त्या ऋणाची फेड होणे अशक्य आहे.
(संपादित)
(संपादित)
भार्गवराम विठ्ठल वरेरकर
दि. ८ जून १९२२
'सत्तेचे गुलाम' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- गंगाधर देवराव खानोलकर (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.