A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
करिते जीवनाची भैरवी

सीमा झाली सोसण्याची, परि दुःख संपले नाही
करिते जीवनाची भैरवी !

हे काय जिणे नित दुःख पिणे, रडतारडता सुख भासविणे
नाती फिरली, प्रीती फिरली, माझे कुणी उरले नाही !

मज तार अता, वा मार अता, मन बावरले तनु सावरता
ही काय दशा, हे परमेशा, ये धावुनिया लवलाही !