कळी कळी उमलते पाकळी
कळी कळी उमलते
पाकळी फुलुनी ये आनंद
आनंदाच्या लहरीवरती जीव नाचतो धुंद
एक अनोखी आली चाहूल
भूमीवरचे सुटले पाऊल
स्वैर भरारे प्राण अंबरे तोडुन सारे बंध
उरी जागते नव संवेदन
कंप सुखाचे अंगअंगातुन
हृदयाचे राजीव उमलले, टपटपतो मकरंद
उगीच लाजते, उगीच रुसते
मी माझ्याशी उगीच हसते
नकळे बाई काय खुळा हा मला लागला छंद
पाकळी फुलुनी ये आनंद
आनंदाच्या लहरीवरती जीव नाचतो धुंद
एक अनोखी आली चाहूल
भूमीवरचे सुटले पाऊल
स्वैर भरारे प्राण अंबरे तोडुन सारे बंध
उरी जागते नव संवेदन
कंप सुखाचे अंगअंगातुन
हृदयाचे राजीव उमलले, टपटपतो मकरंद
उगीच लाजते, उगीच रुसते
मी माझ्याशी उगीच हसते
नकळे बाई काय खुळा हा मला लागला छंद
गीत | - | मधुसूदन कालेलकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | एक धागा सुखाचा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
मरंद (मकरंद) | - | फुलातील मध. |
राजीव | - | कमळ / प्रिय. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.