काय आणितोसी वेड्या
काय आणितोसी वेड्या डोळियांत पाणी
दु:ख-सौख्य सारे अंती एकरूप मानी
जन्मजात तितुका आहे जीव मात्र एक
भोग भोगताहे ज्याचा जसा कर्मलेख
सारखेच असती, नाही उच्चनीच कोणी
उठे एक माती धरुनी भिन्न भिन्न रंग
भिन्नभिन्न दिसती डोळां जळीचे तरंग
लाट लाट विरता राही तळी एक पाणी
रजतरूप दावुनि भुलवी शिंपली उन्हात
सर्परूप दिसता रज्जू कापती मनात
भवाकार खोटा अवघा, ब्रह्म सत्य जाणी
दु:ख-सौख्य सारे अंती एकरूप मानी
जन्मजात तितुका आहे जीव मात्र एक
भोग भोगताहे ज्याचा जसा कर्मलेख
सारखेच असती, नाही उच्चनीच कोणी
उठे एक माती धरुनी भिन्न भिन्न रंग
भिन्नभिन्न दिसती डोळां जळीचे तरंग
लाट लाट विरता राही तळी एक पाणी
रजतरूप दावुनि भुलवी शिंपली उन्हात
सर्परूप दिसता रज्जू कापती मनात
भवाकार खोटा अवघा, ब्रह्म सत्य जाणी
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | प्रभाकर पंडित |
स्वर | - | पुष्पा पागधरे |
गीत प्रकार | - | भावगीत, नयनांच्या कोंदणी |
भव | - | संसार. |
रज्जू | - | दोरी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.