कळा ज्या लागल्या जीवा
कळा ज्या लागल्या जीवा, मला कीं ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्यांचें? कुणाला काय सांगाव्या?
उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई?
समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही,
जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू.
नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा,
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौंकडे दावा.
नदी लंघोनि जे गेले तयांची हाक ये कानीं,
इथे हे ओढती मागे मला बांधोनि पाशांनी.
कशी साहूं पुढे मागे जिवाला ओढ जी लागे?
तटातट् काळजाचे हे तुटाया लागती धागे.
पुढे जाऊं? वळूं मागे? करूं मी काय रे देवा?
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा !

गीत | - | भा. रा. तांबे |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वराविष्कार | - | ∙ लता मंगेशकर ∙ विश्वनाथ बागुल ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
राग | - | देसकार |
गीत प्रकार | - | भावगीत, नाट्यसंगीत |
टीप - • काव्य रचना- ३० जानेवारी १९२२, अजमेर. • स्वर- लता मंगेशकर, संगीत- वसंत प्रभू. • स्वर- विश्वनाथ बागुल, संगीत- श्रीनिवास खळे, नाटक- पाणिग्रहण. |
लंघणे (उल्लंघणे) | - | ओलांडणे, पार करणे. |
हमामा | - | धांगडधिंगा, धुमश्चक्री. |
नोंद
ध्येय आणि परिस्थिती या दोहोंनी ओढल्या जिवाची ओढाताण यात दृष्टोत्पत्तीस येते.
- 'तांबे यांची समग्र कविता' मध्ये नमूद केलेली टिप्पणी.
ध्येय आणि परिस्थिती या दोहोंनी ओढल्या जिवाची ओढाताण यात दृष्टोत्पत्तीस येते.
- 'तांबे यांची समग्र कविता' मध्ये नमूद केलेली टिप्पणी.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.