काजळ रातीनं ओढून नेला
काजळ रातीनं ओढून नेला सये साजण माझा
जीव ये भरुनी भिजते पापणी, कधी रे येशिल राजा
पाऊस येडापिसा जिवाला लावून गेला तांत
तुफान आलं सुसाट, माझा करून गेला घात
कातरवेळी करणी झाली, हरवून गेला राजा
सुकली फुलांची शेज राया, राहिला अर्धा डाव
उधळून जाता खेळ वाया श्वासांनी तोडिला ठाव
भुकेली ज्वानी जळते आतुनी, ये रे ये एकदा राजा

गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | हा खेळ सावल्यांचा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
जिवास तांत लागणे | - | फास लागणे / कोंडमारा होणे. |
तांत | - | धागा / आतड्याची तार. |
पिसे | - | वेड. |
शेज | - | अंथरूण. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.