A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जलधरसंघें नभ भरलें

जलधरसंघें नभ भरलें तें ।
वासित झालें सौरभवातें ॥

कांता जैसी प्रियतम पतिला ।
आलिंगन दे, तशि ही चपला ।
धांवुनि वेगें या मेघाला ।
प्रेमें आलिंगन बघ देते ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर- छोटा गंधर्व
नाटक - मृच्छकटिक
राग - वसंत बहार
ताल-त्रिताल
गीत प्रकार - नाट्यसंगीत
कांता - पत्‍नी.
चपला - वीज.
सौरभ - सुगंध / कीर्ती.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.