काहीतरी तू बोल
काहीतरी तू बोल
तुझे बोलणे झिरपत जाईल,
मनात माझ्या खोल
हसून बोल की वद रागेजून
चिडून बोल की थोडी लाजून
असेल तसला असो दागिना,
सोन्यातच तर असते मोल
फिरव अंगुली, छेड सतार
असो शंकरा, असो बहार
मधुरपणाची तहान आम्हा,
राग रागिण्या सार्या फोल
मुसळधार की तुषार चार
पाऊस पडू दे वारंवार
रखरखलेल्या रानी राणी,
चिखल होऊ दे किंवा ओल
तुझे बोलणे झिरपत जाईल,
मनात माझ्या खोल
हसून बोल की वद रागेजून
चिडून बोल की थोडी लाजून
असेल तसला असो दागिना,
सोन्यातच तर असते मोल
फिरव अंगुली, छेड सतार
असो शंकरा, असो बहार
मधुरपणाची तहान आम्हा,
राग रागिण्या सार्या फोल
मुसळधार की तुषार चार
पाऊस पडू दे वारंवार
रखरखलेल्या रानी राणी,
चिखल होऊ दे किंवा ओल
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | पं. वसंतराव देशपांडे |
चित्रपट | - | आधार |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.