हसले हसले हरवून मला
हसले हसले, हरवून मला मी बसले
कळी मी अबोल होते, वारा लबाड आला
मी अंग चोरीले ग, हळुवार स्पर्श झाला
क्षण ते दंवात भिजले
देठातुनी फुलावे हितगूज एक ओले
कुजबूज पाकळ्यांची, गंधास रंग बोले
सारे मनात ठसले
वेलीवरी धुक्याचा उठता नवा शहारा
स्वप्नात जागले मी छेडीत चंद्रतारा
स्वर ते अबोध कसले
ओशाळल्या मनाला जाणीव आज लाजे
मजला मिळून सारे, काही न आज माझे
म्हणुनी उगाच रुसले
कळी मी अबोल होते, वारा लबाड आला
मी अंग चोरीले ग, हळुवार स्पर्श झाला
क्षण ते दंवात भिजले
देठातुनी फुलावे हितगूज एक ओले
कुजबूज पाकळ्यांची, गंधास रंग बोले
सारे मनात ठसले
वेलीवरी धुक्याचा उठता नवा शहारा
स्वप्नात जागले मी छेडीत चंद्रतारा
स्वर ते अबोध कसले
ओशाळल्या मनाला जाणीव आज लाजे
मजला मिळून सारे, काही न आज माझे
म्हणुनी उगाच रुसले
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | अनुराधा पौडवाल |
गीत प्रकार | - | भावगीत |
हितगूज | - | हिताची गुप्त गोष्ट. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.