A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
काय मला भूल पडलि

काय मला भूल पडलि, भान हरपलें ।
तें मुख वर केलें परि नाहिं चुंबिले ॥

सुंदरिनें अंगुलिनीं ओंठ झांकिले ।
नको नको ऐसें ह्मणत तोंड फिरविलें ।
प्रेमभरें तिनें अर्ध नेत्र मिटियले ।
ऐशा त्या ऐन रंगि व्यंग जाहलें ॥