सांवळी विराजे कृष्ण-मूर्ति ॥१॥
मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं ।
नित्यता पर्वणी कृष्ण-सुखें ॥२॥
हृदय-परिमळीं कृष्ण मनो-मंदिरीं ।
आमुचां माज-घरीं कृष्ण बिंबे ॥३॥
निवृत्ती निघोट ज्ञानदेवा वाट ।
नित्यता वैकुंठ कृष्ण-सुखें ॥४॥
गीत | - | संत ज्ञानेश्वर |
संगीत | - | राम फाटक |
स्वर | - | पं. भीमसेन जोशी |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, संतवाणी |
निघोट | - | परिपूर्ण / निखळ. |
निर्गुणाची बाज मांडली आहे. तीवर सगुणाची शय्या रचली आहे. त्या शय्येवर साकार मूर्ति पहुडली आहे. असे हे विश्वाचे स्वरूप. आमचे मन त्या मूर्तीच्या ध्यानात रमले आहे; डोळा तिच्या दर्शनात; नव्हे, तिचे दर्शनच आमच्या डोळ्यांत. अंत:करणाच्या आवारात चिंतनाचे मंदिर, त्यात जीवनाचे गर्भागार आणि त्याच्याही आत ती मूर्ति - असा हा नित्यानंद आहे ! निखळ वृत्ति-शून्यता ही त्या वैकुंठाकडे जाण्याची वाट ज्ञानदेव सतत चोखाळीत असल्यामुळे तो नेहमी वैकुंठातच असतो.
आचार्य विनोबा भावे
ज्ञानेश्वरांची भजनें
सौजन्य- परंधाम प्रकाशन, वर्धा.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.