A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
काय ग सखू

काय ग सखू?
बोला दाजिबा !

काय ग सखू बोलू का नकू,
घडीभर जरा थांबशील का?
गोडगोड माझ्याशी बोलशील का?

काय सांगू बाई, लई मला घाई
दाजिबा बोलायला येळच नाही !

येळच नाही?
दाजिबा थांबायला येळच नाही !

डोईवर घेऊन चाललीस काही?

डोईवर पाटी, पाटीत भाकरी, भाकरीवर तांब्या
तांब्यात दूध हाय गाईचं, घेता का दाजिबा वाईच?

काय ग सखू, रागावू नकू,
घडीभर जरा थांबशील का?
थांबशील का ग, जातीस कुठं तू सांगशील का?

रानाच्या वाटं घेताय भेट
दाजिबा तुमचं वागणंच खोटं

वागणंच खोटं? पहाटेच्या पारी तू चाललीस कुठं?

पहाटेच्या पारी घेऊन न्याहरी बाई लवकरी,
जाते मी पेरुच्या बागात, येऊ नका दजिबा रागात

काय ग सखू, घाबरू नकू,
घडीभर जरा थांबशील का?
मनात काय तुझ्या सांगशील का?

सांगू कशी मी कस्‌कसं होतं
मनात माझ्या भलतंच येतं

काय ग सखू तुझ्या मनात येतं?

दुखतंय कुठं? कळंना नीट, लाज मला वाटं
दाजिबा तुम्हाला माहीत, जायाचं का आंबराईत?

चल चल सखू, चल ग सखू
जावा दाजिबा, अहो जावा दजिबा !