बाळांनो ऐका थोडे
बाळांनो ऐका थोडे
करा उजळणी म्हणा परवचा, पाठ करा हे पाढे
एकी-एक, दुर्रकी-दोन
जगात आहे एकच ईश्वर, सूर्य-चंद्र ते दोन
सूर्य-चंद्र जणू रथांत बसले त्यास पांढरे घोडे
बाळांनो ऐका थोडे
तीर्की-तीन, चौकी-चार
झेंडा तिरंगी अपुला दावी मार्ग हिताचे चार
समता-प्रीती-शांती-नीतीने वागा तुम्ही जगापुढे
बाळांनो ऐका थोडे
पाच-पांच, साही-सहा
बोटे पाच ती हातास एका, अण्याचे पैसे सहा
चार अण्याचे पंचविस पैसे तुम्ही सोडवा कोडे
बाळांनो ऐका थोडे
साती-सात, आठी-आठ
सात रंग ते इंद्रधनुचे, छत्रीस काड्या आठ
वीज चमकुनी पाऊस पडता भरती नाले-ओढे
बाळांनो ऐका थोडे
नव्वी-नऊ, दाही-दहा
नवरत्नांचा हार जसा तो दिशात फिरला दहा
शिका दहाचे धडे नि लावा विज्ञानाची झाडे
बाळांनो ऐका थोडे
करा उजळणी म्हणा परवचा, पाठ करा हे पाढे
एकी-एक, दुर्रकी-दोन
जगात आहे एकच ईश्वर, सूर्य-चंद्र ते दोन
सूर्य-चंद्र जणू रथांत बसले त्यास पांढरे घोडे
बाळांनो ऐका थोडे
तीर्की-तीन, चौकी-चार
झेंडा तिरंगी अपुला दावी मार्ग हिताचे चार
समता-प्रीती-शांती-नीतीने वागा तुम्ही जगापुढे
बाळांनो ऐका थोडे
पाच-पांच, साही-सहा
बोटे पाच ती हातास एका, अण्याचे पैसे सहा
चार अण्याचे पंचविस पैसे तुम्ही सोडवा कोडे
बाळांनो ऐका थोडे
साती-सात, आठी-आठ
सात रंग ते इंद्रधनुचे, छत्रीस काड्या आठ
वीज चमकुनी पाऊस पडता भरती नाले-ओढे
बाळांनो ऐका थोडे
नव्वी-नऊ, दाही-दहा
नवरत्नांचा हार जसा तो दिशात फिरला दहा
शिका दहाचे धडे नि लावा विज्ञानाची झाडे
बाळांनो ऐका थोडे
गीत | - | हरेंद्र जाधव |
संगीत | - | मधुकर पाठक |
स्वर | - | शाहीर साबळे |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
परवचा | - | तोंडाने म्हटलेली उअजळणी |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.