A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
काल पाहिले मी स्वप्‍न

काल पाहिले मी स्वप्‍न गडे

नयनी मोहरली ग आशा
बाळ चिमुकले खुदकन हसले
मीही हसले, हसली आशा
काल पाहिले मी स्वप्‍न गडे

भाग्यवतीचे भाग्य उजळले
कुणीतरी ग मला छेडिले
आणि लाजले, हळूच वदले
रंग सावळा तो कृष्ण गडे

इवली जिवणी इवले डोळे
भुरुभुरु उडती केसही कुरळे
रुणुझुणु रुणुझुणु वाजती वाळे
स्वप्‍नी ऐकते तो नाद गडे