डाव मांडून भांडून मोडू नको
डाव मांडून भांडून मोडू नको
डाव मोडू नको
आणले तू तुझे सर्व, मी आणले
सर्व काही मनासारखे मांडले
तूच सारे तुझे दूर ओढू नको
सोडले मी तुझ्याभोवती सर्व गे
चंद्रज्योतीरसाचे रुपेरी फुगे
फुंकरीने फुगा, हाय, फोडू नको
'गोकुळीचा सखा' तूच केले मला
कौतुकाने मला हार तू घातला
हार हासून, घालून, तोडू नको
काढले मी तुझे नाव, तू देखिले
आणि माझे पुढे नाव तू रेखिले
तूच वाचून, लाजून, खोडू नको
डाव मोडू नको
आणले तू तुझे सर्व, मी आणले
सर्व काही मनासारखे मांडले
तूच सारे तुझे दूर ओढू नको
सोडले मी तुझ्याभोवती सर्व गे
चंद्रज्योतीरसाचे रुपेरी फुगे
फुंकरीने फुगा, हाय, फोडू नको
'गोकुळीचा सखा' तूच केले मला
कौतुकाने मला हार तू घातला
हार हासून, घालून, तोडू नको
काढले मी तुझे नाव, तू देखिले
आणि माझे पुढे नाव तू रेखिले
तूच वाचून, लाजून, खोडू नको
गीत | - | ना. घ. देशपांडे |
संगीत | - | राम फाटक |
स्वर | - | सुधीर फडके |
राग | - | पहाडी |
गीत प्रकार | - | भावगीत |
चंद्रज्योती | - | चंद्रजोती. चंद्रासारखा प्रकाश देणारे दारुकाम (भुईनळा, चक्र, इ.) |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.