का उगा पतंगा जळसी
मी तर रमते प्रभुचरणांसी, होउनी त्यांची दासी
का उगा पतंगा जळसी?
मला धुंदीचा गंध न कळतो
जीव प्रभुस्तव का तळमळतो?
तू तर वेड्या प्रीती भुकेला, मी परि पावन तुळशी
का उगा पतंगा जळसी?
एक कळे मज, सदा जागणे
नाथांच्या कीर्तनात रमणे
माझी मिणमिण नकळत मिळते त्यांच्या दिव्य प्रकाशी
का उगा पतंगा जळसी?
थांबव नाजूक संथ जाळणे
मजसाठी तव जीवास छळणे
पहा लोचने भिजती पाखरा, खुपते शल्य उराशी
का उगा पतंगा जळसी?
का उगा पतंगा जळसी?
मला धुंदीचा गंध न कळतो
जीव प्रभुस्तव का तळमळतो?
तू तर वेड्या प्रीती भुकेला, मी परि पावन तुळशी
का उगा पतंगा जळसी?
एक कळे मज, सदा जागणे
नाथांच्या कीर्तनात रमणे
माझी मिणमिण नकळत मिळते त्यांच्या दिव्य प्रकाशी
का उगा पतंगा जळसी?
थांबव नाजूक संथ जाळणे
मजसाठी तव जीवास छळणे
पहा लोचने भिजती पाखरा, खुपते शल्य उराशी
का उगा पतंगा जळसी?
गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | अनुराधा पौडवाल |
गीत प्रकार | - | भावगीत, हे श्यामसुंदर |
पतंग | - | दिव्यावर झडप घालणारा पाखरू. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.