जीवनाच्या खिन्न वाटा
जीवनाच्या खिन्न वाटा दूर जाती
प्राणवाती थकुन आता मंद होती
साहताना कितिदा पहारा
याचिला आसवांचा सहारा
पापण्या या कुणासाठी गीत गाती?
मी लतेला हळू स्पर्श केला
जाग त्याची न आली कळीला
पाकळ्या या कुणासाठी धुंद होती?
सोबती ना कुणी सांजवेळी
वाट अंधारली का अवेळी
वाळवंटी पायवाटा अंध होती
प्राणवाती थकुन आता मंद होती
साहताना कितिदा पहारा
याचिला आसवांचा सहारा
पापण्या या कुणासाठी गीत गाती?
मी लतेला हळू स्पर्श केला
जाग त्याची न आली कळीला
पाकळ्या या कुणासाठी धुंद होती?
सोबती ना कुणी सांजवेळी
वाट अंधारली का अवेळी
वाळवंटी पायवाटा अंध होती
गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | भूपेंद्र |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.