झुंजुमुंजु झालं चकाकलं सम्दं
झुंजुमुंजु झालं, चकाकलं सम्दं रान
पगुन् श्यान् सोन्यावानी हरपतंया भान
घरट्यात चिवचिव करीती पाखरं
गव्हानीत चुळूबूळू करीती वासरं
आळुखपिळुख आता कशाचं ग रानी
उपसाया होवं आंधी मोटंचं पानी
सुनं खळं बैलाविना, चार्याविना बैल
जशी र्हाती रायाविना घरात बाईल
शिळंपाकं काहीतरी आन रातचं ग
न्याहारिला बिगीबिगी बसू संगसंग
नग झाकु पदरात कन्साचं दान
नग दावु लई भाव घेईन हातानं
पिरतीचं पीक लई येई माळावर
राबुनशान खाऊ संगं सकाळ दुपार
चढू डोंगरांची माथी तुडवू ओहोळ
हातामंदी घालून हात फिरू रानोमाळ
पगुन् श्यान् सोन्यावानी हरपतंया भान
घरट्यात चिवचिव करीती पाखरं
गव्हानीत चुळूबूळू करीती वासरं
आळुखपिळुख आता कशाचं ग रानी
उपसाया होवं आंधी मोटंचं पानी
सुनं खळं बैलाविना, चार्याविना बैल
जशी र्हाती रायाविना घरात बाईल
शिळंपाकं काहीतरी आन रातचं ग
न्याहारिला बिगीबिगी बसू संगसंग
नग झाकु पदरात कन्साचं दान
नग दावु लई भाव घेईन हातानं
पिरतीचं पीक लई येई माळावर
राबुनशान खाऊ संगं सकाळ दुपार
चढू डोंगरांची माथी तुडवू ओहोळ
हातामंदी घालून हात फिरू रानोमाळ
गीत | - | बाबुराव गोखले |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | गजानन वाटवे |
गीत प्रकार | - | भावगीत |
खळे | - | शेत. |
गव्हाण | - | गोठा. |
झुंजुमुंजु | - | उजाडण्याची वेळ, पहाट. |
तरुवर | - | तरू / झाड. |
मोट | - | विहिरीतून पाणी काढण्याचे मोठे पात्र. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.