जेव्हा तुला मी पाहिले
जेव्हा तुला मी पाहिले, वळुनी पुन्हा मी पाहिले
काही न आता आठवे, होतो कधी का भेटलो
पटता खुणा या वाद का, होतो कधी का भेटलो?
या सागराने का कधी होते नदीला पाहिले?
जाणी तुझे नच नांव मी, प्रीती अनामिक जन्मता
वारा विचारी का फुला हा गंध आहे कोणता?
तू ऐस कोणी कामिनी, मी स्वामिनी तुज मानिले !
होऊन एकच चालणे, या दोन वाटा संपती
उंचावते तेथे धरा आभाळ येईं खालती
हरतात दोघेही जिथे कोणी कुणाला जिंकिले?
काही न आता आठवे, होतो कधी का भेटलो
पटता खुणा या वाद का, होतो कधी का भेटलो?
या सागराने का कधी होते नदीला पाहिले?
जाणी तुझे नच नांव मी, प्रीती अनामिक जन्मता
वारा विचारी का फुला हा गंध आहे कोणता?
तू ऐस कोणी कामिनी, मी स्वामिनी तुज मानिले !
होऊन एकच चालणे, या दोन वाटा संपती
उंचावते तेथे धरा आभाळ येईं खालती
हरतात दोघेही जिथे कोणी कुणाला जिंकिले?
गीत | - | वसंत निनावे |
संगीत | - | बाळ बर्वे |
स्वर | - | तलत महमूद |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.