संसारी या माझ्या अवघा
श्री रघुनंदन तुझेच चिंतन, सदैव मुखी तव नाम
संसारी या माझ्या अवघा तूच प्रभू श्रीराम !
तूच निर्मिले सुंदर हे घर
नभ मायेची त्यावर पाखर
रूप आगळे तुझे धनुर्धर, विश्वची हे निज धाम
तुझिया चरणी अर्पून तनमन
भावभक्तिचे हृदयी पूजन
मीच विसरते माझे मीपण, तुझेच अवघे भान
जीवनात या राम असावा
जन्मोजन्मी नित्य भजावा
तुझा लाभू दे मला विसावा, हेच हवे वरदान
संसारी या माझ्या अवघा तूच प्रभू श्रीराम !
तूच निर्मिले सुंदर हे घर
नभ मायेची त्यावर पाखर
रूप आगळे तुझे धनुर्धर, विश्वची हे निज धाम
तुझिया चरणी अर्पून तनमन
भावभक्तिचे हृदयी पूजन
मीच विसरते माझे मीपण, तुझेच अवघे भान
जीवनात या राम असावा
जन्मोजन्मी नित्य भजावा
तुझा लाभू दे मला विसावा, हेच हवे वरदान
गीत | - | रजनीकांत राजाध्यक्ष |
संगीत | - | प्रभाकर पंडित |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | तुमची खुशी हाच माझा सौदा |
गीत प्रकार | - | राम निरंजन, चित्रगीत |
आगळा | - | अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.