जीवनगीत अमोल असे
जीवनगीत अमोल असे, गाऊया
यौवन हे बहर नवा, मोहर जपुनी हा ठेवूया
उसळुनी येती खळखळुनी सागरधारा
अलगद मिळती शब्द-सूरांसम गगन-धरा
या समयी लय चुकता, गीतच जाईल लया
पाऊल चुकता पथही चुके, ताल चुके
नयनांपुढती नकळत जमते दाट धुके
व्याधी किती जडती जीवा, औषध न मिळे तया
यौवन हे बहर नवा, मोहर जपुनी हा ठेवूया
उसळुनी येती खळखळुनी सागरधारा
अलगद मिळती शब्द-सूरांसम गगन-धरा
या समयी लय चुकता, गीतच जाईल लया
पाऊल चुकता पथही चुके, ताल चुके
नयनांपुढती नकळत जमते दाट धुके
व्याधी किती जडती जीवा, औषध न मिळे तया
गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | कनू घोष |
स्वर | - | सुरेश वाडकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.