जय जय विठ्ठल रखुमाई
पंढरीच्या त्या देवमंदिरी गजर एक होई
जय जय विठ्ठल रखुमाई
क्षेत्र असे हे परमार्थाचे
पावन जीवन हो पतितांचे
पुंडलिक तो पावन झाला प्रभु-मंगल पायी
द्वारावतीचे देवकिनंदन
गोरोबास्तव भरती रांजण
विदुराघरच्या कण्या घेतसे श्याम शेषशायी
आसक्तीविण येथे भक्ती
प्रभु नांदतो त्यांच्या चित्ती
चिंतन करता चिरंतनाचे, देव धाव घेईं
जय जय विठ्ठल रखुमाई
क्षेत्र असे हे परमार्थाचे
पावन जीवन हो पतितांचे
पुंडलिक तो पावन झाला प्रभु-मंगल पायी
द्वारावतीचे देवकिनंदन
गोरोबास्तव भरती रांजण
विदुराघरच्या कण्या घेतसे श्याम शेषशायी
आसक्तीविण येथे भक्ती
प्रभु नांदतो त्यांच्या चित्ती
चिंतन करता चिरंतनाचे, देव धाव घेईं
गीत | - | मधुकर जोशी |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | निर्मला गोगटे |
गीत प्रकार | - | विठ्ठल विठ्ठल, भक्तीगीत |
द्वारावती | - | द्वारका. |
विदुर | - | विचित्रवीर्याच्या अंबिकानामक भार्येच्या दासीला व्यासापासून झालेला पुत्र. हा नि:पक्षपाती, न्यायी व शहाणा होता. |
शेष | - | पृथ्वी डोक्यावर तोलून धरणारा सर्पांचा राजा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.