A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जयदेवा बजरंगा बलभीमा

जयदेवा बजरंगा बलभीमा धांवा
वायुसुता हनुमंता शक्तीच्या देवा
भक्तसख्या बळवंता अंजनीच्या जीवा
आरती ओवाळितो मानुनी घ्या सेवा

​ एका उड्डाणांतच पाऊल लंकेला
कळलें नाहीं केव्हां गेला अन् आला
हुंकारी ओंकार शक्तीचा ठेवा
तुझिया सामर्थ्याचा पारच ना ठावा

गेली लंका गेली एकच हो टाळी
पहिल्या पावन स्पर्शें पापांची होळी
थरथरला रावण करी असुरांचा धांवा
धडधडला अंगार पुच्छाशीं जेव्हां

पुच्छाशीं अंगार, मुखांत ओंकार
वायुच्या सामर्थ्यें वाढवी आकार
त्रिगुणात्मक वीरबली भक्तांच्या भावा
ऋद्रा तव रूपाचा काळाला हेवा
अंजनी - मारुतीची आई.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.