जाणीव नेणीव भगवंती
जाणीव नेणीव भगवंतीं नाही ।
उच्चारणीं पाहीं मोक्ष सदा ॥१॥
नारायण हरी उच्चार नामाचा ।
तेथे कळी-काळाचा रीघ नाही ॥२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
ते जीवजंतुसि केवि कळे ॥३॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ ।
सर्वत्र वैकुंठ केले असे ॥४॥
उच्चारणीं पाहीं मोक्ष सदा ॥१॥
नारायण हरी उच्चार नामाचा ।
तेथे कळी-काळाचा रीघ नाही ॥२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
ते जीवजंतुसि केवि कळे ॥३॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ ।
सर्वत्र वैकुंठ केले असे ॥४॥
गीत | - | संत ज्ञानेश्वर |
संगीत | - | श्रीधर फडके |
स्वर | - | सुरेश वाडकर |
गीत प्रकार | - | संतवाणी |
कळिकाळ | - | संकट. |
केविं | - | कशा प्रकारे. |
जाणीव | - | जाणण्याची शक्ती / बुद्धी, ज्ञान. |
नेणीव | - | अज्ञान. |
रीघ | - | प्रवेश. |
भावार्थ-
हरि-नाम स्मरणात जाणिवेला किंवा नेणिवेला विशेष किंमत नाही. मुख्य, भाव पाहिजे. भावपूर्वक हरि-नामाचे उच्चारण करीत गेल्याने न कळत हृदयाची शुद्धी होतच जाते. नाम-स्मरणाची ही जादू वेदानांही पूर्णपणे आकलन झालेली नाही. मग सामान्य जिवाला ती कशी कळणार? नाम-स्मरणाने हे जगच वैकुंठ-स्वरूप, मोक्षधाम होऊन जाते.
आचार्य विनोबा भावे
ज्ञानेश्वरांची भजनें
सौजन्य- परंधाम प्रकाशन, वर्धा.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.