A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जन विजन झालें आह्मां

जन विजन जालें आह्मां ।
विठ्ठलनामा प्रमाणे ॥१॥

पाहें तिकडे मायबाप ।
विठ्ठल आहे रखुमाई ॥२॥

वन पट्टण एकभाव ।
अवघा ठाव सरता जाला ॥३॥

आठव नाहीं सुखदु:खा ।
नाचे तुका कौतुकें ॥४॥
भावार्थ

येथे ही तुकाराम महाराज स्वतःबद्दल आणि अशाच इतर भक्तांबद्दल म्हणतात, "लोकवस्तीचा प्रदेश किंवा निर्जन वनप्रदेश हे आम्हाला, विठ्ठलनामाचे प्रमाण आम्ही मानतो. त्यामुळे सारे एकच झाले आहे. जिकडे पाहतो तिकडे माझा पिता विठ्ठल आणि आई रखुमाबाई नांदत आहेत, असेच मला दिसते. अरण्य असो किंवा शहर असो, आमच्या मनात भेदभाव नाही. सर्व ठिकाणी पांडुरंगरूपच दिसते. आता सुखदुःखाला जागा राहिली नाही. आम्ही आता सर्वत्र साम्य अनुभवत असल्यामुळे आनंदाने नाचत आहोत."

डॉ. प्रा. जे. बी. शिंदे
देवमुक्त, धर्ममुक्त तुकारामांची गाथा
सौजन्य- स्वरूप प्रकाशन, पुणे-कोल्हापूर.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.