A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जांई परतोनी बाळा

जांई परतोनी, बाळा, जांई परतोनी ।
निष्ठुर मी तुज टाकुन जातें, येशि कशाला माझ्या मागोनी ॥

जन्मतांच तव जननी गेली सोडुनि तुज या तपोवनीं ।
मींच पाळिलें लाड करोनी, कांहिं न अडलें कीं तुझें ।
गेलें जरी मीं, काय उणें तुज सांभाळिती बाबा तुजलागुनि ॥