जा शोध जा किनारा
जा शोध जा किनारा
जीवननौका गोते खाई, झुरतो जीव बिचारा
गहिवरल्या हृदयात जळावी अश्रूंमधली गाणी
थरथरत्या ओठात विरावी हळवी आर्त विराणी
निराधार ही सुता धरेची, कोठे आज निवारा?
धरणीच्या उदरात फुटावी जलतृष्णेची लाही
झडली पानफुलांची माया, छाया कुणी न देई
अनोळखी या दैवगतीचा भासे शून्य पसारा
वादळवारा काजळधारा गिळती डोंगरलाटा
पुसून गेल्या वाळूवरल्या ओल्या पाऊलवाटा
डोळ्यांपुढती गिरक्या घेई दाही दिशांची कारा
जीवननौका गोते खाई, झुरतो जीव बिचारा
गहिवरल्या हृदयात जळावी अश्रूंमधली गाणी
थरथरत्या ओठात विरावी हळवी आर्त विराणी
निराधार ही सुता धरेची, कोठे आज निवारा?
धरणीच्या उदरात फुटावी जलतृष्णेची लाही
झडली पानफुलांची माया, छाया कुणी न देई
अनोळखी या दैवगतीचा भासे शून्य पसारा
वादळवारा काजळधारा गिळती डोंगरलाटा
पुसून गेल्या वाळूवरल्या ओल्या पाऊलवाटा
डोळ्यांपुढती गिरक्या घेई दाही दिशांची कारा
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | अनोळखी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
आर्त | - | दु:ख, पीडा. |
कारा | - | कारावास. |
तृष्णा | - | तहान. |
वसुंधरा (वसुधा, धरा) | - | पृथ्वी. |
सुता | - | कन्या. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.